निंभोर्यात धाडसी घरफोडी : बंद घरातून दिड लाखांचा मुद्देमाल लांबवला
बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर : भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल : गस्त वाढवण्याची अपेक्षा
Daring house burglary in Nimbhora: Goods worth one and a half lakhs were stolen from a closed house भुसावळ : तालुक्यातील निंभोरा येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत एक लाख 81 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
निंभोरा बु.॥, दीपनगर येथील हॉटेल त्रिमूर्तीमागे तक्रारदार सचिन आत्माराम तायडे (43) हे कुटुंबासह वास्तव्यास आहे. कामानिमित्त ते परीवारासह गावाला गेल्याने 17 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 22 नोव्हेंबरच्या रात्रीच्या 10 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील रेक्झीन पिशवीतील सोन्या-चांदीचे दागिणे, देवाच्या मूर्ती, देवघरातील देवतांच्या चांदीच्या मूर्ती, रोकड, नवे-जुने कपडे तसेच स्टीलचे भांडे मिळून एक लाख 81 हजार 59 रुपयांचा ऐवज लांबवला.


तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तायडे कुटुंब बाहेरगावाहून घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.
