निंभोरा बु.॥ गावातील ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाची दुचाकी लांबवली
Nimbhora The bike of the transport businessman in the village was extended भुसावळ : तालुक्यातील निंभोरा बु.॥ गावातील रहिवासी असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाची 20 हजार रुपये किंमतीची चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
भालचंद्र आत्माराम तायडे (44, निंभोरा) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायीक असून त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 बी.झेड.8406) असून मंगळवार, 22 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रेतचंद सपकाळे करीत आहेत.


