मुक्ताईनगर तालुक्यातील दोघा प्रौढांची आत्महत्या

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद : आत्महत्येचे कारण अस्पष्ट


Suicide of two adults in Muktainagar Taluka मुक्ताईनगर : तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रौढांनी विषारी औषध प्राशन करीत तसेच गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या घटनांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पहिल्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील सोपान सखाराम धामोडे (50) यांनी 11 नोव्हेंबर रोजी काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातून कागदपत्रे आल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विजय पढार करीत आहेत.



चिंचोलला गळफास घेत आत्महत्या
दुसर्‍या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील हातमजुरी करणार्‍या मोहन तोताराम तायडे (40) यांनी घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विनोद श्रीनाथ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !