बोदवड तालुक्यात आयशर-दुचाकी अपघातात बेटावदच्या युवकाचा मृत्यू


A youth from Betavad died in an Eicher-two-wheeler accident in Bodvad taluka बोदवड : आयशर गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने बेटावद खुर्दच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात साळशिंगी ते भानखेडा रस्त्यावरील करंजी पुलाजवळ शुक्रवार, 25 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडला.

आयशर चालकाविरोधात गुन्हा
आयशर (क्रमांक एम.एच.20 ईएल.2119) ने पिंपळगावहून बेटावदकडे जाणार्‍या दुचाकी (क्रमांक एम.एच.05 टी 1210) ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार भगवान विश्वनाथ उगले (31, बेटावद खुर्द) हा युवक जागीच ठार झाला. अपघात घडताच आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलिसात आयशर चालक आकाश बनकर (20, रा.पान वडोद, ता.सिल्लोड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कॉन्स्टेबल अयुब तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !