यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग
A minor girl was molested in Yawal Taluka यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आडगावच्या तरुणाविरोधात गुन्हा
17 वर्षीय अल्पवयीन मुलीने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सायंकाळी ती तिच्या मैत्रिणी सोबत बीडगाव-मोहरद रोडवरून जात असतांना तिचा पाठलाग करीत संशयीत जावेद समशेर तडवी (रा.आडगाव) याने रस्त्यात अडवत तु मला आवडते म्हणून तिचा हात ओढला. अल्पवयीन मुलीने सोबत जाण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्ती ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत अश्लील शिवीगाळ केली.


पोस्को अन्वये गुन्हा दाखल
हा प्रकार अल्पवयीन मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर जावेद तडवी याने मुलीच्या कुटुंबास देखील घरी जावुन अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात जावेद तडवी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.
