संतापजनक ! : नाशिक शहरातील आधाराश्रमात पाच शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार
Five schoolgirls sexually assaulted in Nashik’s Aadharashram नाशिक : महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच नाशिकमधूनही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर आधाराश्रमातील अन्य पाच मुलींचे शोषण झाल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील म्हसरूळ शिवारातील ज्ञानदिप गुरुकुल आधाराश्रमात चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार केल्याची घटना गुरुवार, 24 रोजी समोर आल्यानंतर अन्य मुलींच्या जवाबात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संशयीत हर्षल मोरे ऊर्फ सोनू विरोधात म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी संचालक संशयित हर्षल मोरे याने अत्याचार केला होता मात्र ही घटना गत गुरुवारी उघडकीस आली. पीडितेला संशयित हर्षल मोरे उर्फ सोनू सर याने 13 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडीतेने घडलेला प्रकार तिच्यासोबतच्या अन्य मुलींना सांगितल्यानंतर त्यांनीहीदेखील हर्षल सरांनी आमच्यासोबतसुद्धा असाच प्रकार केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या दिशेनेही अधिक सखोल तपास करत मुलींचे जाबजबाब नोंदविले. यामधून चार ते पाच मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे जबाबात म्हटले आहे.


आरोपीला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी
ज्ञानदीप आधाराश्रमाचा संचालक संशयित हर्षल मोरे यास पोलिसांनी अटक केली असून जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास येत्या बुधवारपर्यंत (30) पोलीस कोठडी सुनावली आहे.
