अट्टल दुचाकी चोरट्याच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या


Wanted accused in two-wheeler theft case in Jalgaon local crime branch जळगाव : अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. दीपक भास्कर सपकाळे (27, धामणागाव, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीताविरोधात जळगाव शहर व तालुका पोलिसात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी रविवारी धामणगावात असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आणि शहर पोलिस ठाण्यात आरोपी दीपक सपकाळे विरोधात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून संशयीत दीपक हा धामणगावात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळताच पथकाने रविवारी त्याला अटक केली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे यांनी आरोपीला अटक केली. दरम्यान, आरोपी दीपकने साथीदार ईश्वर जगन्नाथ सपकाळे (धामणगाव) याच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !