अनियंत्रीत दुचाकी पुलाच्या भिंतीवर आदळली : काहुरखेड्यातील दोघे तरुण ठार


भुसावळ : भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती काहुरखेडा फाट्यावरील पुलाच्या भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात काहूरखेडा येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. सुरज रामदास तांबे (15, काहूरखेडा) व सुनील विठ्ठल भालेराव (20 वाघारी, ता.जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.

एकाचा जागीच मृत्यू
सुरज रामदास तांबे व सुनील विठ्ठल भालेराव हे दोघे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक (एम.एच.19 डी.1600) द्वारे भरधाव वेगाने जात असताना दुचाकी काहुरखेडा फाटयावरील पुलाला धडकल्याने सुरजच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनीलच्या मानेला जबर मार लागल्याने त्यास जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अपघात प्रकरणी पोलिस साहेबराव शांताराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . तपास उपनिरीक्षक किशोर पाटील व हवालदार विजू बाविस्कर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !