देश जोडण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावली : आमदार शिरिष चौधरी
यावल शहरातील काँग्रेसची ‘हात से हात जोडो’ अभियानाबाबत बैठक
यावल : देश जोडण्याकरीता रस्त्यावर उतरून खासदार राहुल गांधी हे पुढे सरसावले असून हात से हात जोडो या अभियानासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने स्वत:ला झोकून देत देश हितार्थ कार्य करावे, असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. शहरात आयोजित ‘हात से हात जोडो’ अभियान संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करीत होते.
देशात जाती धर्मात विद्रोह निर्माण करण्याचे कार्य सुरू
शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सोमवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते. या बैठकीत त्यांनी देशातील सर्वधर्मियांना सोबत घेवुन देशाला प्रगती पथावर काँग्रसेने नेले मात्र सद्या देशाची अवस्था मोदी व त्यांच्या भाजप सरकारने काय केली आहे हे सर्वांच्या समोर आहे. देशात सध्या जाती-धर्मामध्ये विद्रोह निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे व देश जोडण्याकरीता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी रस्त्यावर उतरले आहेत. देश वाचवायचा असेल तर सर्वधर्मियांना जोडणे आवश्यक आहे व त्यासाठी काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ या अभियानाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने पुढे सरसावले पाहिजे, असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले.


यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीस जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, जावेद सैय्यद, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप सोनवणे, माजी नगरसेवक शेख असलम शेख नबी, शेतकी संघाचे अमोल भिरूड, चंद्रकला इंगळे, सैयद युनूस, समीर मोमीन, यावल शहराध्यक्ष कदीर खान, फैजपूर शहराध्यक्ष कलीम खान, विक्की गजरे, इमरान खान, शांताराम भालेराव, हाजी गफ्फार शाह, गणेश गुरव, विजय गजरे, लिलाधर सोनवणे, अजय मेढे, विनोद सोनवणे, पीरन तडवी, नईम शेख, बशीर तडवी, शेख सकलैन सह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल भिरूड यांनी तर आभार कदीर खान यांनी मानले.
