मराठी भाषा संवर्धन काळाची गरज : प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने
रावेर : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी विभाग आणि प्राध्यापक प्रबोधिनी यांच्यामार्फत सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषेची ‘आजची सांप्रत स्थिती’ या विषयावर प्रा. महेंद्र सोनवणे यांनी सविस्तर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी भाषा हे संवाद साधण्याचे माध्यम असून सर्व व्यवहार मराठी भाषेतून झाले पाहिजे, असे सांगितले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.किशोर कोल्हे, प्रा.एच.एम.बाविस्कर, प्रा.एस.बी.महाजन, प्रा.डॉ.सतीश पाटील, प्रा.डॉ.पी.आर.गवळी, प्रा.डॉ.सतीश वैष्णव, प्रा.डॉ.पी.आर.महाजन, प्रा.डॉ.व्ही.एन.रामटेके, प्रा.सुनील इंगळे, प्रा. डॉ.साळुंखे, प्रा.मुळे, प्रा.अक्षय महाजन, प्रा.बारी, प्रा.अंकुर पाटील, महेंद्र महाजन, सुनील पाटील, गोपाल पाटील, नितीन महाजन, श्रेयस पाटील, जयेश बढे, ऋषीकेश महाजन, अनिकेत पाटील इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. आभार ग्रंथपाल प्रा.संदीप साळुंखे यांनी मानले.
