डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अजय मेढे


फैजपूर : शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त जयंती उत्सव समिती 2023 चे गठण करण्यात आली. सम्राट बुध्द विहारात झालेल्या बैठकीत जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून त्यात स्वराज्य डी.जे.चे संचालक अजय (मुन्नाभाऊ) मेढे यांची सर्वानुमते समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अन्य पदाधिकारी असे
उपाध्यक्षपदी सागर भालेराव, सचिव सुलेमान तडवी, सहसचिव चेतन गाढे, खजिनदार राजनंदन मेढे, कार्याध्यक्ष धीरज मेढे, सल्लागार सुभाष मेढे, विलास मेढे, सदस्य विनोद तायडे, योगेश मेढे, गोल्डन मेढे, दीपक हिवरे, राजू वाघ, अर्पित मेढे, विशाल छरे, आर्यन केदारे, सचिन कोचुरे या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीस अनिल मेढे, राहुल मेढे, हर्षल मेढे, गौरेश वानखेडे, पप्पू मेढे, विक्की मेढे, अमोल तायडे, चेतन मेढे, अतुल मेढे, सुमित मेढे, रोहित मेढे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !