Chief Minister Eknath Shinde जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधीला कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Jalgaon district development funds will not be allowed to go down: Chief Minister Eknath Shinde जळगाव : जिल्ह्यातील विविध कामांना आता गती मिळाली आहे. सिंचन प्रकल्पांना निधी मिळण्यासह जिल्ह्यात वारकरी भवनाची निर्मिती करण्यासह अन्य मागण्यांची पूर्तता करण्यात येईल व जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर येथील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी गुरुवारी दिली.

आरोपांना कामांनी देणार उत्तर
मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे हा सरकारचा प्रयत्न आहे. नार-पार गिरणा तापी प्रकल्पाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हे सामान्यांचे सरकार असून निर्णय तुमच्यासाठीच घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्यातील वारकरी भवन, यावल उपसा सिंचन योजनेला 592 कोटींची निधी तसेच निम्न तापी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले की, धरणगाव, चोपडा, पाचोरा, मुक्ताईनगर, व एरंडोल या पाच तालुक्यांमध्ये एमआयडीसीला मंजुरी देण्यात आली असून जळगाव, धुळे व नंदुरबार येथे विभागीय कार्यालय लवकरच सुरू करण्यात येईल.

केळीचा पोषण आहारात करणार समावेश
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख केळी पिकाचा पोषण आहारात समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

अहिराणीत भाषणाने सुरूवात करीत जिंकली मने
मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरूवातीला समदासले रामराम, जय खान्देश म्हणत भाषणाची सुरूवात केल्याने टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, कुठलेही आश्वासन देताना आधी दहा वेळा विचार करावा व आश्वासन पाळावे, अशी स्व.बाळासाहेबांची शिकवण आहे व ती शिकवण व विचार घेवून आम्ही चालत आहोत असे त्यांनी सांगत महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !