हनी ट्रॅपद्वारे लुट करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात


Robbery gang caught in police net by honey trap पुणे : युवकांना नग्न करत फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी मागणार्‍या आरोपींच्या टोळीला कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून कामशेतसह लोणावळा कुसगाव, वडगाव, तळेगाव येथे अशा पद्धत्तीचे गुन्हे घडल्यानंतर आरोपींच्या शिर्डी येथे जाऊन मुसक्या आवळण्यात आल्या.

या आरोपींना केली अटक
प्रतीक उर्फ लाया अर्जुन निळकंठ (24, रा.छावा चौक, कामशेत), रूपेश उर्फ कवठ्या विजय लालगुडे (24, रा.कुसगांव खुर्द), सतीश कृष्णकुमार बिडलाम (28, रा.कामशेत), रोहित गणेश चोपडे (27, रा. कामशेत), साहील महादेव भिसे (व20,रा.चिंचवड) व महिला आरोपी (वय 20, रा. वडगाव मावळ) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय युवकाने कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकावण्याची धमकी
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास महिला आरोपीने बेडसे येथील 24 वर्षीय फिर्यादी व त्याचे मित्र यांच्या मोबाइलवर फोन करून त्यांना शिवशंकर मंगल कार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार फिर्यादी व त्याचे चार मित्र हे त्या महिलेस भेटण्यासाठी गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वर नमूद आरोपींनी फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना चामडी पट्टा, लाकडी दांडके व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना पिस्तुलचा धाक दाखवून तुमच्याविरुद्ध बलात्काराची केस करतो अशी भीती घालून त्यांना गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !