भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी वयोवृद्धाचा मृत्यू


Unidentified elderly person dies at Bhusawal railway station भुसावळ : रेल्वे स्थानकावरील साऊथ साईड बुकींग खिडकीजवळ 68 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाल्याची घटना 5 रोजी घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रेल्वे स्थानकावरील साऊथ साईड तिकीट बुकींग खिडकीजवळ 68 वर्षीय अनोळखी वयोवृद्धाचा 5 रोजी मृत्यू झाला.

ओळख पटत असल्यास साधा लोहमार्ग पोलिसांशी संपर्क
उंची 5.2, नाक चपटे, बसके, रंग सावळा, शरीरबांधा सडपातळ, डोक्याचे केस पांढरे, चेहरा गोल, दाढी वाढलेली असे अनोळखी वृद्धाचे वर्णन आहे. अनोळखीची ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्गचे एएसआय अरुणा कोहरे (7888295733) वर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !