भुसावळातील 21 उपद्रवींना शिवजयंतीला शहर बंदी
21 miscreants in Bhusawal banned by the city on Shiv Jayanti भुसावळ : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या 21 उपद्रवींना 7 ते 11 मार्च या कालावधीत शहरात येण्यास मनाई करण्यात आली असून त्यानंतरही आदेशाचे उल्लंघण झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
उत्सव शांततेत पार पाडण्याचे पोलिसांचे नियोजन
धुलीवंदन, शिवजयंती हे सण, उत्सव आनंदात पार पडण्यासाठी उपद्रवींना शहरबंदीचे प्रस्ताव तयार करून प्रांताधिकार्यांकडे पाठवण्यात आले होते व त्यावर नुकताच निर्णय झाल्याने 21 जणांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. बाजारपेठ, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवींचा यात समावेश आहे. दरम्यान, शिवजयंतीला शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अश्या 9 मिरवणूका निघणार असल्याने पोलिस प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन केले असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

