श्री क्षेत्र वालझिरी संस्थानाच्या विकासासाठी भरीव निधी : खासदार उन्मेश पाटील यांचा सत्कार


चाळीसगाव  : श्री क्षेत्र वालझिरी संस्थानाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने खासदार उन्मेश पाटील यांचा पिंपरखेड ग्रामस्थांसह श्री क्षेत्र वालझिरी देवस्थान समितीतर्फे सत्कार करण्यात आला. निधी मंजूर झाल्यानंतर समिती सदस्यांनी प्रत्यक्ष खासदारांची भेट घेत त्यांचे आभार मानले. अध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव सतीश देशमुख यांनी तुळशी माळ व श्री तुकाराम गाथा ग्रंथ देऊन खासदारांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थान सदस्य मच्छिंद्र राठोड, अजित सोमवंशी, विजय ठूबे, प्रशांत देशमुख, दिपक भोसले, सुनील जाधव, रवींद्र राजपूत, सुनील जगताप, वसुंधरा फाऊंडेशनचे सचिन पवार यांच्यासह वारकरी भाविक भक्त उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !