यंदा राज्यात होणार विपूल प्रमाणात पाऊस : हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख

कुर्‍हा येथे शेतकरी मेळावा : यंदा समाधानकारक पाऊस होणार


There will be abundant rain in the state this year : Meteorologist Punjabrao Dakh कुर्‍हाकाकोडा : यंदा महाराष्ट्रत चांगला पाऊस होणार असून त्यासाठी आपल्याला मात्र अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण करावे लागेल कारण तापमानात वाढ होत चालली आहे. यंदा 22 जून ते 28 जून पर्यंत पाऊस चांगला पडेल व जुलै व आगस्ट ते ऑक्टोबर दिवाळीपर्यंत जोरदार पाऊस होईल, असे हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांनी येथे सांगितले. कुर्‍हाकाकोडा येथे बुधवार, 5 एप्रिल रोजी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय पाटील यांच्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात डख बोलत होते.

तेलंगना सरकारकडूनही हवामानाची विचारणा
पंजाबराव डख म्हणाले की, मला महाराष्ट्रच नाही तर आता तेलंगना सरकारनेदेखील हवामानासह पावसाची माहिती देण्यास सांगितले आहे कारण हवामानावर माझा मोठा अभ्यास झाला आहे. तुम्ही जम्मू काश्मीरला जा आणि तिथून हवामानाचा अंदाज विचारा केवळ दोनच मिनिटात माहिती मिळेल, असेही ते म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे, कुर्‍हा लोकनियुक्त सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांनी संजय पाटील यांचा प्रसंगी गौरव केला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, डॉ.विष्णू रोठे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष रामराव पाटील, सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, अनंत पाटील, कादीर शाह, गजानन पाटील, युवराज माहुरकर, संतोष पाटील, रामराव पाटील, अंबादास पाटील, नितीन खिरळकर, डॉ.गजानन खिरळकर, भैय्या कांडेलकर, सुशील भुते, संदीप वाकुलकर, शिवा आढाव, अशोक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य व सोसायटीचे सर्व संचालक, कुर्‍हा-वढोदा गटातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन मयूर साठे यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !