नातवाच्या वाढदिवसानिमित्त मुसाळतांडा शाळेला क्रीडा साहित्याची भेट

भुसावळातील ललवानी फाउंडेशनचा उपक्रम : अनोख्या वाढदिवसाचे कौतुक


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील मुसाळतांडा गावातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्याचे भेट देण्यात आली. निमित्त होते ते आरवच्या वाढदिवसाचे. भुसावळातील ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांचा नातू चिरंजीव आरव याच्या वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धत्तीने साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव मिळण्यासाठी क्रिकेट साहित्यासह फुटबॉल, रॅकेट, बॉल आदी खेळांचे साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
क्रीडा साहित्य केंद्रप्रमुख के.पी.चौधरी, मुख्याध्यापक दीपक सुरवाडे, उपशिक्षक प्रवीण मोरे, वराडसीमचे मुख्याध्यापक किशोर माळी, मांडवे दिगरचे मुख्याध्यापक संजय वंजारी, भिलमळीच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील यांच्याकडे ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी, उपाध्यक्ष शोभा ललवाणी, ललवाणी परीवाराचे अर्ध्वयु मदनलालजी ललवाणी, जैन चातुर्मास समितीचे अध्यक्ष टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. याप्रसंगी या शाळेतील शिक्षक प्रवीण मोरे म्हणाले की, ललवाणी परीवाराने सदैव मुसाळतांडा येथील प्राथमिक शाळेत भेटी देऊन विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्याचप्रमाणे क्रीडा साहित्य शाळेला उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची भावना रुजू होण्यास मदत होणार आहे. आरवच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किटे वाटप करण्यात आली. शाळेने संधी उपलब्ध करून दिल्याने ललवाणी फौंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा ललवाणी यांनी शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले. प्रतिकुल परीस्थितीत जगत असलेल्या गरीब मुलांना कपडे वाटप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !