भुसावळात वीर सावरकर गौरव यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन केला जाणार नाही ः आमदार संजय सावकारे


Spontaneous reception of Veer Savarkar Gaurav Yatra in Bhusawal भुसावळ : शहरात वीर सावरकर गौरव यात्रेचे आगमन झाल्यानंतर भाजपा प्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे..! आम्ही सारे सावरकर..! भारत माता की जय..! अशा घोषणा देत संपूर्ण वातावरण सावरकरमय केले. जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिरापासून गौरव यात्रेला रविवारी सकाळभ सुरूवात करण्यात आली. गौरव यात्रेत भुसावळ शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परीषद, भारत विकास परीषद, हिंदू जागरण मंच बजरंग दल, प्रतिष्ठा महिला मंडळ, जय मातृभूमी मंडळ शंभूराजे मंडळ, एकता मंडळ व भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनीही उस्फूर्त सहभाग नोंदवला. दरम्यान, याप्रसंगी स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे आमदार संजय सावकारे यांनी मनोगतात ठणकावून सांगितले.

यांचा गौरव यात्रेत सहभाग
यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, राजेंद्र चौधरी, शैलेजा पाटील, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे, युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, किरण महाजन, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, दिलीप कोळी, अ‍ॅड.प्रकाश पाटील, सुनील महाजन, गोलू पाटील, सदानंद उन्हाळे, अतुल झांबरे, प्रशांत पाटील, किरण चोपडे, समाधान पवार, आनंद ठाकरे, प्रशांत निकम, ज्ञानदेव झोपे, संजय भिरुड, भैय्या महाजन, गणेश धनगर, दीपक तायडे, दीपक सावकारे, गिरीश महाजन, मुकेश पाटील, सतीश सपकाळे, अजय नागराणी, निक्की बत्रा, किशोर पाटील, किरण कोलते, देवेंद्र वाणी, बापू महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, पवन बुंदेले, योगेश मांडे, महेंद्र मांडे, प्रसाद पांडे, जीवन दीक्षीत, गणेश वढवेकर, वासुदेव बोंडे, नारायण रणधीर, सुरेश कुटे, जयंतीलाल सुराणा, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, सुनील सोनवणे, कैलास शेलोडे, पराग भोळे, राजू खरारे, शंकर शेळके, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, सोनल महाजन, प्रीतमा पाटील, सुषमा पाटील, सारीका जैन, डॉ.छाया देशमुख, वैशाली सेतवाल, यामिनी चौधरी, शोभा राजने, संगीता पाटील, कविता चौधरी, कविता ठाकूर, जयंत माहुरकर, संजय बोचरे, प्रा.विलास अवचार, प्रवीण इखणकर, जयंत जंगले, विशाल जंगले, रवी ढगे, गोलू राणे, शिशिर जावळे, चेतन चौधरी, केशव गेलानी, प्रमोद पाटील, मुकुंद निमसे, चेतन बोरोले, भावेश चौधरी, राहुल तायडे, प्रशांत देवकर, प्रा.प्रशांत नरवाडे, प्रा.प्रशांत पाटील, रुपेश देशमुख, विशाल नाटकर, अभिजीत मेने, प्रसन्न पांडे, सचिन सपकाळे, जितेंद्र कोळी, गोरलाल जाधव, कुणाल येवले, नागेश खरारे, श्रेयस इंगळे, चेतन सावकारे, गोपीसिंह राजपुत, लखन रणधीर, लव झाडगे, नंदकिशोर बडगुजर, गौरव आवटे, शेखर धांडे, लोकेश जोशी, मयुर सावकारे, नितीन नाटकर, योगेंद्र हरणे, दिनेश दोधानी, अथर्व पांडे यांच्यासह हजारोच्या संख्येने स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !