भुसावळ शहरात आजपासून‘जागर आईच्या स्मृतींचा’


भुसावळ : शहरातील माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांच्या मातोश्री गं.भा.प्रेमलता नेवे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाल्याने आईच्या स्मृती कायम जपण्यासाठी सोमवार ते मंगळवारदरम्यान तीन दिवस काव्यवाचन, एकपात्री प्रयोग व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, 10 रोजी रात्री आठ वाजता काव्यवाचन सादरीकरण कवयित्री जयश्री काळवीट (भुसावळ) व संगीत विषारद पियुषा नागेश नेवे (जळगाव) करतील. मंगळवार, 11 रोजी रात्री आठ वाजता एकपात्री प्रयोग ‘आई’ चे सादरीकरण प्रसिद्ध कलावंत संगीता किरण बोलके (भुसावळ) करतील शिवाय बुधवार, 12 रात्री आठ वाजता दीपक महाराज यांचे कीर्तन होईल. सर्व कार्यक्रम शहरातील ‘अटल’ निवासस्थान, गंगाराम प्लॉट, भुसावळ येथे होणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीकांत मधुकर नेवे, संजय मधुकर नेवे, दीपक मधुकर नेवे
व प्रा.डॉ.सुनील मधुकर नेवे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !