Jitendra Patil as District Officer of Bhusawal Division भुसावळ विभागाच्या प्रांताधिकारीपदी जितेंद्र पाटील : उद्या पदभार स्वीकारणार !
Jitendra Patil as District Officer of Bhusawal Division: Will take charge tomorrow! भुसावळ : मनमानी कारभारासह अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी भुसावळातील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे सेवानिवृत्तीला दिड महिना बाकी असतानाच राज्य शासनाने निलंबन केल्याने भुसावळ विभागाची धूरा कुणाकडे जाणार? याकडे नागरीकांचे लक्ष लागून असतानाच अहमदनगर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांची भुसावळ विभागाच्या प्रांताधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्यातील 14 उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्या केल्या असून बदलीनंतर तत्काळ अधिकार्यांनी आपल्या पदाचा पदभार घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नूतन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील उद्या घेणार पदभार
भुसावळचे प्रांत रामसिंग सुलाणे यांनी अधिकाराचा अमर्याद गैरवापर केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीअंती त्यांचे नुकतेच निलंबन करण्यात आल्याने भुसावळात कुणाची नियुक्ती होते याकडे लक्ष लागले होते मात्र भुसावळ प्रांताधिकारी पदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र पाटील हे बुधवारी जळगावात पदभार घेणार असलेतरी भुसावळात गुरुवारपासून प्रत्यक्षात कामकाजाला सुरूवात करणार आहेत.

सर्वसामान्यांना न्याय देणार : जितेंद्र पाटील
जितेंद्र पाटील यांच्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ टीमने संपर्क केल्यानंतर ते म्हणाले की, यापूर्वी जळगाव जिल्ह्यात काम केल्याचा अनुभव आहे. जळगाव येथे असताा रोजगार हमी योजने उपजिल्हाधकारी म्हणून काम केल्याने जिल्हा आपल्यासाठी नवीन नाही. भुसावळ शहरातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल शिवाय आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल तसेच पालिकेवर प्रशासक म्हणून जवाबदारी असल्याने नागरीकांना सोयी-सुविधा पुरवण्याला आपले प्राधान्य असेल. गुरुवारी आपण शहराचा पदभार स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले.
