भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन


भुसावळ : श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शैक्षणिक वर्षादरम्यान केलेल्या विशेष शैक्षणिक कामगिरीचा वार्षिक गौरव सोहळा पार पडला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.रविकांत परदेशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, सचिव मधुलता शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोषाध्यक्ष अ‍ॅड.एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, बिसन अग्रवाल, पंकज संड, संजय नाहाटा, कैलाश शर्मा, प्राचार्य डॉ.आर.बी.बारजिभे, स्नेहसंमेलन प्रमुख धीरज अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. अहवाल वाचन करताना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. बारजिभे यांनी महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शैक्षणिक वर्षादरम्यान मिळवलेले यश आणि विविध क्षेत्रात केलेली प्रगती याबाबतची माहिती दिली. स्नेहसंमेलन सूत्रसंचालन डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी तअनंत भिडे यांनी समन्वय व किशोर चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले. रोजगार मिळणे इतकाच संकुचित दृष्टीकोन न ठेवता भावी अभियंते रोजगार निर्मिती कशी करू शकतील असा विचार करावा. विविध उपक्रम राबवण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षणासोबतच प्रात्यक्षिक, खेळ, मनोरंजन आणि वाचन यांचा संतुलित समन्वय यशस्वी जीवनासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी यांनी यावेळी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !