जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सायली महाजन प्रथम
भाजपा स्थापनादिनानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन
भुसावळ : साई निर्मल फाउंडेशन, भुसावळ संचलित श्री नमो विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण 135 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेत सायली गणेश महाजन (खडका) ही प्रथम आली तर कुमार विष्णू महाजन (पाचोरा, व्दितीय) आला तसेच शोभाबाई अंबादास वारके (मस्कावद, तृतीय) आल्या. निबंध स्पर्धेत शेंदुर्णी येथील दिवाकर नाना बडगुजर प्रथम तसेच चोपड्यातील डॉ.प्रतीक्षा राजेंद्र सोनवणे द्वितीय व जळगावातील अबोली रवींद्र पाटील तृतीय आली. स्पर्धेचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे व प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

