पिंप्रीसेकमच्या शेतकर्‍यांचे आश्वासनानंतर आंदोलन मागे

15 दिवसात उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


After the promise of the farmers of Pimprisekam, the protest is called off भुसावळ : पिंप्रीसेकम शिवारात कृषी फिडरवर 24 तास मिळणार्‍या वीजपुरवठ्यात कपात करून 1 एप्रिलनंतर केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात असल्याने या निषेधार्थ शेतकर्‍यांनी सोमवारी दीपनगर औष्णिक केंद्राच्या पिंप्रीसेकम शिवारातील पंपींग हाऊससमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. रात्री उशिरा महावितरणच्या अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. पिंप्रीसेकममध्ये कृषी वाहिनीला 24 तास वीजपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरी मिळताच वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन महावितरणचे अभियंता धांडे यांनी दिल्यानंतर तूर्त आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, 15 दिवसात उपाययोजना न झाल्यास शेतकर्‍यांनी दीपनगर औष्णीक केंद्राचे पंपींग हाऊस बंद करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

ठिय्या आंदोलनाने उडाली खळबळ
पिंप्रीसेकम शिवार दीपनगरातील राखेच्या प्रदूषणामुळे बाधीत आहे. जमिनी नापिक झाल्याने पिकांना अधिक प्रमाणात पाणी लागते. यामुळे पिंप्रीसेकम शिवारात कृषी वाहिनीवर 24 तास वीजपुरवठा यापूर्वी केला जात होता मात्र 1 एप्रिलपासून शेतकर्‍यांना 24 तासांतून आठ तास वीजपुरवठा केला जात असल्याने भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी सोमवारी शेतकर्‍यांनी पिंप्रीसेकम येथील दीपनगर प्रशासनाच्या पंपींग हाऊस समोर ठिय्या मांडला. रात्री उशिरा महावितरणने आंदोलनाची दखल घेतली. अभियंता धांडे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली व वरीष्ठांकडे 24 तास वीजपुरवठ्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचे सांगून वरीष्ठांनी मंजुरी देताच सुरळीत वीजपुरवठा करण्यात आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी तूर्त आंदोलन मागे घेतले. दरम्यान, 15 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला दरम्यान, आंदोलनस्थळी सोमवारी आमदार संजय सावकारे यांनी भेट दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !