पाडळसे गावातील प्रौढाची गळफास घेत आत्महत्या


An adult in Padalse village committed suicide by hanging himself यावल : यावल तालुक्यातील पाडळसे गावातील प्रौढाने राहत्या घरात छताला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याचा मृतदेह तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पाडळसे, ता.यावल येथील विलास मोतीराम तायडे (51) असे मयताचे नाव आहे.

राहत्या घरात साडीने घेतला गळफास
तायडे यांनी घरात असताना छताला असलेल्या लाकडी दांड्याला साडी बांधली आणि साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार रवींद्र मोरे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !