भुसावळातील शांती नगरात मध्यरात्री धाडसी चोरी : 68 हजारांचा ऐवज लांबवला


Daring theft at midnight in Shanti Nagar in Bhusawal: Compensation of 68 thousand delayed भुसावळ  : पोलिसांच्या गस्तीलाच आव्हान देत चोरट्यांनी शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू केल्यानंतरही चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. वर्दळीच्या व हायप्रोफाईल परीसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शांतीनगरातही मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराची खिडकी तोडून 68 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे.

धाडसी चोरीने उडाली खळबळ
शहरातील शांती नगरात माधुरी बढे या वयोवृद्ध पतीसह वास्तव्यास आहेत. बढे दाम्पत्य मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेनंतर हॉलमध्ये झोपल्यानंतर चोरट्यांनी बेडरूमची खिडकी बाजूला काढून ठेवत घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याच्या दागिण्यांसह 30 हजारांची रोकड लांबवली. सुमारे आठ तोळे सोने चोरट्यांनी लांबवल्याचे सांगण्यात आले. शहरचे निरीक्षक गजानन पडघण, सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, सहायक फौजदार मोहंमद अली सैय्यद, इकबाल सैय्यद, जाकीर सय्यद, जाकीर मन्सुरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. बढे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी श्वान पथकासही पाचारण केले मात्र त्याच भागात तो घुटमळला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !