भुसावळात गावठी कट्ट्याच्या धाकावर दरोड्याच्या प्रयत्नातील त्रिकूट जाळ्यात
Bhusawal in Gavathi Katta, the trio in the trap of robbery attempt भुसावळ : गावठी कट्टा व काडतूस बाळगून दहशत निर्माण करीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील त्रिकूटाच्या भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांच्या ताब्यातून दोन जिवंत काडतूस व गावठी कट्टा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ललित तुलसीदास खरारे (22), जितेंद्र आनंद बोयत (23) व पवन किसन खरारे (27, सर्व रा.वाल्मीक नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील वाल्मीक नगरातील संशयिताकडे गावठी कट्टा व जिवंत काडतूस असून त्या आधारे ते दशहत निर्माण करीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजता पथकाने तीनही संशयितांना अटक करीत त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस, 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.ए.2865) व 27 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज पाटील, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी, नाईक संकेत झांबरे आदींच्या पथकाने केली.
