भुसावळ बाजार समिती सभापतीपदासाठी 24 मे रोजी निवडणूक

बिनविरोध होणार निवड : प्रत्येकी एक-एक वर्ष मिळणार संधी


Election on 24th May for Bhusawal Bazar Committee Chairman भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरींच्या ताब्यातील बाजार समितीवर भाजपाचा भगवा फडकवण्यात आमदार संजय सावकारे यांना यश आल्यानंतर आता बाजार समितीत प्रथम सभापती व उपसभापती पदासाठी कुणाला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे. निवडून आलेल्या संचालकांपैकी प्रत्येकी एकाला सभापती व उपसभापती पदाची संधी देण्याचे धोरण भाजपाने अवलंबले आहे. शहरात बुधवार, 24 मे रोजी सकाळी 11 वाजता निवड प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी प्रशांत विरकर यांनी निवड कार्यक्रम जाहिर केला आहे.

बिनविरोध होणार निवडणूक
भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने 18 पैकी 15 जागा ताब्यात घेत बहुमत मिळवले. जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी सभापती व उपसभापती निवडीच्या बैठकीचे अध्यासी अधिकारी म्हणून पणन विभागाचे विशेष लेखापरीक्षक पी.के.विरकर यांची नियुक्ती केली आहे. विरकर यांनी सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूकीचे वेळापत्रक जाहिर केले असून बुधवारी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक होणार आहे. बाजार समितीवर भाजपची बहुमताने सत्ता असल्याने सभापती व उपसभापती निवड बिनविरोध होणार आहे. भाजपातर्फे सभापती पदासाठी माधूरी संजय पाटील (साकेगाव), सोपान भारंबे (साकरी), कैलास महाजन (कन्हाळे बुद्रूक), अनिल चिंधू वारके (खडका), नीलेश वाणी (वराडसीम), अनिल विठोबा पाटील (किन्ही) आदी संचालक प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

मोठ्या गावातील सदस्यांना संधी
सत्ताधारी भाजपने यंदा पाच वर्षांत प्रत्येक एक वर्षासाठी एक सभापती या प्रमाणे पाच संचालकांना सभापती पद देण्याचे नियोजन केले आहे तर एका वर्षासाठी दोन उपसभापतींना संधी देण्याची चर्चा सुरू आहे. सभापती पदाची संधी नवीन चेहरे तसेच मोठ्या गावांतून निवडून आलेल्या संचालकांना देण्यासाठीही भाजपचा कल आहे. आमदार संजय सावकारे यांनी याबाबत अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !