भुसावळ शहरातील व्यापार्‍यांना धमकावून मागितली खंडणी : संशयिताला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी


Bhusawal city traders were threatened and demanded ransom:  Suspect remanded to police custody for two days भुसावळ : शहरातील खरात हत्याकांडातील संशयित राजा मोघे याने आपल्या भावासह अन्य दोन हस्तकांच्या मदतीने दोन व्यापार्‍यांना धमकावून खंडणी मागितली होती. या प्रकरणी योगेश मोघे व रीतीक उर्फ गोलू निदाने यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयिताना शनिवारी न्यायालयात हजर केले असता योगेश उर्फ सोनू हिरालाल मोघे याची न्यायालयीन कोठडीत तर रीतीक निदाने यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तपासात अनेक बाबी येणार समोर
बुधवार, 17 मे रोजी खरात हत्याकांडातील संशयीत राजा मोघे यास न्यायालयीन तारखेवर आणल्यानंतर संशयिताने मोबाईलवरून हस्तकांच्या मध्यस्थीने गुजराथी स्वीट मार्टचे कपिल मेहता यांच्याकडे दहा हजारांची खंडणी मागितली होती तर गोपी मॉलचे रवींद्र झामनानी यांच्याकडेही 20 हजारांची खंडणी मागण्यात आली. संशयितांनी महामार्गावरील एका हॉटेल चालकासह अशोक वाईन्समध्ये खंडणी मागण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित नसल्याने आरोपींचे संभाषण झाले नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे खंडणी बहाद्दराकडे कट्टा असल्याची माहिती व्यापार्‍यांनी पोलीस यंत्रणेला दिली असून त्या अनुषंगानेही आरोपीची आता पोलीस कोठडीत चौकशी केली जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !