जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी फैजपूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा


A case against two people from Faizpur for creating communal tension यावल : फैजपूर शहरातील दोन जणांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याने दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर पोलिसांची सतर्कता
फैजपूर शहरातील रहिवासी गणेश चौधरी व मनोज इंगळे या दोन तरुणांनी आपल्या व्हॉटसअ‍ॅपवर जातीय तेढ निर्माण होईल, असे स्टेटस ठेवले होते. दोघांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जावून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. हा प्रकार फैजपूर पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात हवालदार राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून गणेश चौधरी व मनोज इंगळे या दोघांविरुद्ध जातीय तेढ निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे डी.वाय.एस.पी.डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !