साकळीतील अल्पवयीन मुलाविरूध्द धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा


यावल : तालुक्यातील साकळी येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल व धार्मिक भावना दुखावतील अशी पोस्ट इंस्टाग्राम वरून शेअर केली होती. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

भावना दुखावणारी टाकली पोस्ट
साकळी गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या इन्स्टाग्रामच्या सोशल नेटवर्कवर दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल व धार्मिक भावना दुखावतील, अशा प्रकारचं पोस्ट टाकली होती. हा प्रकार यावल पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात हवालदार गणेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !