तळवेलला इलेक्ट्रीक दुकानात चोरी करताना तरुण जाळ्यात : साथीदार पसार
Young caught in theft in electrical shop in Talvel: Accomplices released भुसावळ : तालुक्यातील तळवेल येथे इलेक्ट्रीक दुकानातून पंप चोरताना एका चोरट्यास रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपीचा साथीदार मात्र मोटार पंप घेवून पसार झाला. दहा हजारांचे पंप चोरल्याप्रकरणी दोघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एक संशयिताला अटक, दुसरा पसार
सुनील अशोक पाटील (50, तळवेल) यांचे तळवेल गावात इलेक्ट्रीक पंप दुरुस्तीचे दुकान आहे. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास संशयित सागर गौतम शिरूर (कपिलवस्तीनगर, भुसावळ) व सुनील क्षिरसागर इंगळे (कपिल वस्तीनगर, भुसावळ) हे दुकानाबाहेर दुचाकी (एम.एच.28 डब्ल्यू.2825) ने आल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रीक दुकानातून विलास पाटील व सोपान भारंबे यांचे प्रत्येकी पाच हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक पंप चोरी केले मात्र त्याचवेळी दुकान मालक सुनील पाटील यांना चोरट्यांची चाहूल लागल्याने त्यांनी आरडा-ओरड करीत संशयित सागर शिरूर यास दुचाकीसह पकडले तर दुसरा संशयित सुनील इंगळे हा अंधाराचा फायदा घेत दहा हजारांच्या इलेक्ट्रीक मोटार घेवून पसार झाला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.
