वीज चोरी करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ; दसनूरच्या पाच जणांविरोधात गुन्हा


यावल : रावेर तालुक्यातील दसनूर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यात पाच जण वीज चोरी करतांना आढळून आले. या पाच जणांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड अदा केला नाही म्हणून या सर्व पाच जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दंड न भरल्याने गुन्हा दाखल
दसनूर, ता.रावेर येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मंगेशकुमार यादव यांनी पथकासह दसनूर गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली. यामध्ये विनोद भीमराव तायडे, सरलाबाई उत्तम तायडे, वत्सलाबाई भागवत तायडे, विजय देविदास तायडे व जितेंद्र टोपलू तायडे हे पाच जण वीज चोरी करतांना आढळले. या पाच जणांनी चोरी केलेल्या वीज युनिटप्रमाणे त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या पाच जणांनी दंड न भरल्याने या सर्व पाच जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करून निंभोरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !