भुसावळातील तापेश्वर महादेव मंदिराचा कळस चोरट्यांनी लांबवला


Thieves delayed the completion of Tapeshwar Mahadev temple in Bhusawal भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र रोखण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले असताना चोरट्यांनी आता भाविकांच्या आस्था असलेल्या मंदिराचा कळसच लांबवल्याने भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सात हजारांचा कळस लांबवला
शहरातील पंधरा बंगला भागात तापेश्वर महादेव मंदिर असून या मंदिरावर पितळी कळस लावण्यात आला होता मात्र चोरट्यांनी संधी साधून सात हजार रुपये किंमतीचा कळस लांबवला. ही चोरी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सेतू सुविधा केंद्र चालक आशिश शशिकांत तिवारी यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अन्वर शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !