मुंबई-लखनऊ एक्स्प्रेसमध्ये तोतया तिकीट निरीक्षकाकडून तिकीट तपासणी : भुसावळात आवळल्या मुसक्या


Ticket check by fake ticket inspector in Mumbai-Lucknow Express: Smiles in Bhusawal भुसावळ : 22121 डाऊन मुंबई-लखनऊ या वातानुकूलित एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रवाशाचे तिकीट तपासणारा निरीक्षकच तोतया निघाल्याने प्रवासीवर्गात खळबळ उडाली आहे. संशयिताविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. राजेश सी. ठाकूर (अंबरनाथ, ठाणे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. दरम्यान, संशयिताकडे रेल्वेचे ओळखपत्र आढळले असून तेदेखील बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कर्मचार्‍याचा संशय ठरला खरा
शनिवार, 20 रोजी बी- 3 या डब्यातून सुटीवर असलेले रेल्वे दक्षता विभागाचे योगेश यादव हे गाडीतून प्रवास करीत असताना प्रवाशाकडील तिकीटाची तपासणी सुरू असताना यादव यांना संशय आल्याने त्यांनी संबंधिताना विचारणा केल्यानंतर संबंधिताने आपण तिकीट निरीक्षक असल्याची बतावणी केली मात्र चौकशीत संशयित तोतया टीसी असल्याचे स्पष्ट होताच मुख्य दक्षता निरीक्षक पंकज वाडे यांना माहिती कळवण्यात आली.

भुसावळात संशयिताला अटक
वाडे यांनी तपासणी मुख्य तिकीट निरीक्षक रईस अहमद यांना तिकीट तपासणी कर्मचारी पाठवण्यास सांगितल्यानंतर डी.एन.चौधरी व जावेद शेख यांनी गाडीतील प्रवाशांची विचारपूस करीत घडलेला प्रकार जाणून घेतला. भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅट क्रमांक सहावर रात्री आठ वाजता येताच संशयिताचा अभियोग पथकाचे मुख्य तिकीट निरीक्षक विनयकुमार मन्नीलाल सचान हे रामेश्वर प्रसाद, राज थानवाल आणि शेख इम्रान यांच्यासह भुसावळ आरपीएफचे एसआय नंदलाल राम यांनी ताबा घेतला. यावेळी ऑन ड्युटी कंडक्टर जी.एस.दुग्गल आणि रजेवर प्रवास करणार्‍या योगेश यादव यांचे पत्र घेत संशयिताविरोधात चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात सीटीआय व्ही.के.सचान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !