मोठे वाघोदा येथे प्राणघातक हल्ला : तिघे जखमी, जमावाविरोधात गुन्हा


Assault at Big Waghoda : Three injured, crime against mob सावदा : मोठे वाघोदा येथे दुचाकीचा हॉर्न दिल्यानंतर तरुण बाजूला न झाल्याच्या वादातून एका समाजातील जमावाने प्राणघातक हल्ला केल्याने तिघे जखमी झाले. या ही घटना सोमवार, 22 मे रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी नऊ मुख्य आरोपींसह अन्य अनोळखी 20 ते 25 जणांच्या जमावाविरोधात सावदा पोलिसात प्राणघातक हल्ला व दंगलीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वादानंतर जमावाचा हल्ला
हॉटेल व्यावसायीक तरुण मयूर शांताराम माळी (19, वाघोदा बु.॥, ता.रावेर) याच्या तक्रारीनुसार, त्याचा मित्र आदित्य गोकूळ महाजन हा बुलेटवरून जात असताना एका समाजाचा मुलगा बाजूला न झाल्याने त्यावरून वाद झाला व तो वाद फिर्यादीच्या वडिलांनी मिटवल्यानंतर संशयित इलियास खान यांनी यांचे नेहमीचेच झाले आहे, यांना आता एक-एक करून संपवले पाहिजे, अशी चिथावणी देत जमावाला घेवून माळीवाडा भागातील मयूर शांताराम माळी यांचे घर गाठत, कुटूंबातील सदस्यांना रस्त्यावर आणले व तक्रारदाराचे काका धनराज माळी यांच्या डोक्यावर लोखंडी ईटानीने वार केले तसेच अन्य आरोपींनी छातीवर पोटावर, पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच फिर्यादीचे काका, वडिल व आई यांना शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली.

या संशयितांविरोधात गुन्हा
या प्रकरणी संशयित इलियास खान, सोहेल खान, अलताफ खान उर्फ हवा, भुरा हॉटेलवाल्याचा लहान मुलगा उजेफ खान, मोईन खान, युनूस मिस्तरीचा मुलगा, इम्रान खान रीक्षावाला, वाजीद खान, आवेश खान (सर्व रा.वाघोदा बुद्रुक) व अनोळखी 20 ते 25 जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर फळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !