केर्‍हाळा गावातून दुचाकी लांबवली


रावेर : रावेर तालुक्यातील केर्‍हाळा गावातील रीक्षा स्टॉपजवळ उभी करण्यात आलेली दुचाकी चोरट्यांनी संधी साधून लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तारसिंग जालम बारेला (35, गढताल, ता.बर्‍हाणपूर) हे कामानिमित्त केर्‍हाळा येथे चुलत भाऊ यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.68 झेड.ए.5022) घेवून आले असता त्यांनी रीक्षा स्टॉपजवळ लावलेली दुचाकी चोरट्यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास लांबवली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने बारेला यांनी रावेर पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कॉन्स्टेबल नितीन डांबरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !