मध्यरात्री त्रिकूट चोरट्याने मंदिरात दानपेटी फोडत जनरल स्टोअर्सला केले टार्गेट


यावल : तालुक्यातील किनगाव येथील मुख्य चौकात असलेल्या हनुमान मंदिराची दानपेटी अज्ञात तिघांनी फोडलली तसेच मुख्य चौकातील जनरल शॉपमध्ये चोरी केली. हा संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

25 हजारांचा मुद्देमाल लंपास
किनगाव, ता.यावल येथील मुख्य चौकात हनुमान मंदिर असून मंदिरातील दानपेटी अज्ञात तीन भामट्यांनी फोडली. हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला तसेच मुख्य चौकातील रामरहिम जनरल शॉपचे दुकान देखील अज्ञात चोरट्यांनी फोडले. रात्री एक वाजता तीन चोरटे गावात दाखल झाले व त्यांनी केलेला चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला. रामरहिम जनरल स्टोअर्समधून 15 हजारांचे साहित्य चोरी झाले तर मंदिराच्या दान पेटीतून देखील सुमारे 10 हजारांची चिल्लर लांबवल्याचे मंदिरातील सेवेकर्‍यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !