मोठा वाघोदा गावात हाणामारी : दुसर्या गटाचीही तक्रार
सावदा : येथून जवळ असलेल्या मोठा वाघोदा येथे सोमवार, 22 रोजी बुलेटचा हॉर्न वाजविल्यानंतर वाद होवनू प्रारंभी मयूर शांताराम माळी यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या संशयितांविरोधात गुन्हा
या प्रकरणी दुसर्या गटाकडून देखील तक्रार दाखल करण्यात आली असून यात फैजलखान इस्माईल खान यांनी फिर्याद दिली. आदित्य माळी याच्या बुलेट गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून मयुर शांताराम माळी, गजानन वसंत माळी, शांताराम माळी आणि आदित्य माळी (सर्व रा.वाघोदा बुद्रुक, ता.रावेर) यांनी शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विनोद पाटील करीत आहे.
