यावल तालुक्यात चक्री वादळात शेकडो हेक्टरावरील केळी जमीनदोस्त, परसाडेत घर कोसळल्याने घोड्याचा मृत्यू

सातपुड्याच्या पायथ्याशी केळी उत्पादक संकटात : पंचनामे करून भरपाई मिळण्याची केळी उत्पादकांची मागणी


In Yaval taluka, hundreds of hectares of bananas were uprooted by a cyclonic storm, a horse died after a house collapsed in Parsade यावल : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात रविवारी मध्यरात्री नंतर व सोमवारी पहाटे पूर्वी तुफान चक्रीवादळ दाखल झाले. यात शेकडो हेक्टरवरील केळी पीक जमीनदोस्त झाले. कापणी योग्य केळीचे प्रचंड नुकसान झाले असून या चक्रीवादळात परसाडे बुद्रुक या गावात घर कोसळून घोड्याचा मृत्यू ओढवला. चक्रीवादळात शेतकर्‍यांच्या हातात तोंडाशी आलेला खास हिरावून गेला असून प्रशासनाकडून पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची पेक्षा आहे.

कापणीयोग्य केळीचे नुकसान
यावल तालुक्यात सोमवारी पहाटे पूर्वी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परीसरात तुफान चक्रीवादळ दाखल झाले. या चक्रीवादळामध्ये डोंगरकठोरा, वड्री, परसाडे, सावखेडासीम, मोहराळे, दहिगाव, चुंचाळे, नायगाव, वाघझिरासह परीसरात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. यात प्रामुख्याने कापणी योग्य झालेल्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या. केळी पिकाला यंदा चांगला भाव होता तर शेतकर्‍यांची कापणी योग्य केळीवर मदार होती मात्र कापणी योग्य झालेली केळी या चक्री वादळात थेट जमीनदोस्त झाली. यामध्ये शेतकर्‍याचा हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेला. या भागात तातडीने पंचनामे होत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.

परसाडे बुद्रुकला घर कोसळले : वरातीतील घोड्याचा मृत्यू
परसाडे बुद्रुक गावात चक्रीवादळामुळे पीरखा लालखा तडवी यांच्या घराचे पत्री शेड कोसळल्याने घोड्याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटेपूर्वी आलेल्या चक्रीवादळात कुणाला मदत करणेदेखील शक्य झाले नाही. तडवी यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन असलेला घोडा नवरदेवांची वरातीकरीता ते नेत असत. सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा घोडा मृत झाल्यानंतर तलाठी समीर तडवी, ग्रामसेवक मजीत तडवी यांनी पंचनामा केला तर पशूवैद्यकिय अधिकारी डॉ.भगुरे यांनी शवविच्छेदन केले.


कॉपी करू नका.