कांद्यावरून गुरे नेल्याच्या वादातून रीधुरी गावात महिलेला चौघांची मारहाण
यावल : तालुक्यातील रीधुरी या गावात कांद्यावरून गुरे गेल्याच्या कारणावरून एका 37 वर्षीय महिलेला चार जणांची मारहाण केली व शिविगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
रीधुरी, ता.यावल या गावात एका खळ्यात कांदे सुकवण्यास टाकले होते व तेथून सोनी धनराज सोनवणे (37) ही महिला आपले गुरे घेऊन जात असताना गुरे कांद्याकडून जात आहे. याचा राग येऊन सतीश सुखदेव सोनवणे, आरती सतीश सोनवणे, युवराज सुखदेव सोनवणे व यमुना सुखदेव सोनवणे (सर्व रा.रीधुरी) या चौघांनी या महिलेला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली व मारहाण केली. यात महिलेला दुखापत झाली असून या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे.
