भुसावळात रोजगार मेळाव्यात 110 उमेदवारांना नियुक्तीपत्र

पारदर्शक भरती प्रक्रियेने उमेदवार भारावले : रेल्वे प्रशासनाचे मानले आभार


भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयात मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या मेळाव्यात 110 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी 110 उमेदवारांना अतिरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासकीय) सुनीलकुमार सुमन यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यांची मेळाव्यास उपस्थिती
या कार्यक्रमात अतिरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासकीय) सुनील कुमार सुमन, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी, सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे, सहायक कार्मिक अधिकारी प्रदीप कलाल, सहाय्यक कार्मिक अधिकारी अतुल राईकवार उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे यांनी तर आभार वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी यांनी मानले. सर्व कल्याण निरीक्षक, कार्मिक विभाग, भरती विभाग, एस.टी.विभाग, विद्युत विभाग, अभियांत्रिकी विभागाने सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !