शेलवड येथून अल्पवयीन तरुणीला पळवले
बोदवड : बोदवड तालुक्यातील शेलवड येथील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्या प्रकरणी तरुणाविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाविरोधात गुन्हा दाखल
बोदवड पोलिसात अल्पवयीन मुलीच्या 45 वर्षीय वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यांच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित भूषण संतोष हट (शिंदी कॉलनी, पाचोरा) याने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. तपास हवालदार संतोष जगन्नाथ चौधरी करीत आहेत.
