यावलला तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ.राजु तडवी


Dr. Raju Tadvi as Yavala Taluka Health Officer यावल : यावल पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील तालुका आरोग्य अधिकार्‍याच्या रीक्त जागेवर तालुका आरोग्य अधिकारी म्हणुन डॉ.राजू मुसा तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदलीत त्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी पदभार स्विकारला आहे.

अखेर पूर्णवेळ अधिकारी लाभले
यावल तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी पद गेल्या वर्षांपासून प्रभारी होते व तालुक्यात कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नव्हते. तूर्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज चौधरी यांच्याकडे पदभार होता तर आता यावल येथे कायमस्वरूपी यावल तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.राजु मुसा तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बुधवारी येथील कार्यालयात आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी त्यांचे कार्यालयात तालुका आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.गफूर तडवी, आरोग्य सहाय्यक डी.सी.पाटील, जयंत पाटील, संतोष भंगाळे, आशिष शिंदे, प्रशांत शिंपी, आशा संघटक प्रतिभा ठाकूर, सिकलसेलचे सुहास कुलकर्णी, टी.बी.चे नरेंद्र तायडे, मिलिंद राणे, शकील तडवी, मिलिंद जंजाळे, ग्रामीण रुग्णालयचे डाटा एन्ट्री ऑपरेटर अमित तडवी आदींनी स्वागत केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !