शिंदे सरकारला जागे करण्यासाठी जळगावात जागरण-गोंधळ


Violent agitation in Jalgaon to wake up the Shinde government जळगाव : जळगावात पांढर्‍या सोन्याला वाजवी भाव मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले असून शिंदे सरकारला जागे करण्यासाठी उपोषणस्थळी जागरण गोंधळ घालत निषेध करण्यात आला. दरवाढीच्या आशेने शेतकर्‍यांनी कापूस साठवून ठेवला आहे. शेतकर्‍यांच्या या व्यथेकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधी पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून निवेदने दिली. आंदोलने, मोर्चे काढल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. शेवटचा पर्याय म्हणजे आमरण उपोषण करण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे घेतला, असे पाटील म्हणाले.

यांची उपोषणप्रसंगी उपस्थिती
जागरण गोंधळाचे पूजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटील व त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांनी जळगांव जिल्हा काँग्रेसच्यावतीने उपोषणाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक सचिव प्रा.डॉ.सुनील नेवे , राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, रावेर बाजार समितीचे सभापती सचिन रमेश पाटील, जळगाव बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, संचालक अरूण पाटील,गट प्रमुख लक्ष्मण सपकाळे, युवकचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत चौधरी आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !