वरणगावात हौदात बुडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू


A five-year-old boy died after drowning in a well in Varangaon भुसावळ : खेळताना पाच वर्षीय चिमुकला हौदात पडल्याने बुडून मरण पावल्याची घटना तालुक्यातील वरणगावातील सरस्वती नगरात मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. कर्णव हेमेंद्र बडगुजर (5, वरणगाव) असे मयताचे नाव आहे.

खेळताना चिमुकला पडला हौदात
भुसावळ तालुक्यातील बोहर्डीच्या एका शिक्षण संस्थेत शिपाई असलेल्या हेमेंद्र बडगुजर यांना दोन मुले असून ते सरस्वती नगरात वास्तव्यास आहेत. घराबाहेरच त्यांनी पाण्याचा साठा करण्यासाठी हौद बांधला असून मंगळवारी खेळत असताना चिमुकला कर्णव त्यात पडला मात्र बराच वेळ होवून कर्णव दिसत नसल्याने त्याच शोध सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. बुधवारी कर्णववर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्णव हा शहरातीलच सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सिनीयर केजीमध्ये शिक्षण घेत होता. चिमुकल्याच्या अकाली मृत्यूने शहरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !