लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच मोहाडीतील तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू
जळगाव : साखरपूड्यानंतर काही दिवसांवर लग्न आल्यानंतर घरात उत्साहाचे वातावरण असतानाच रेल्वे अपघातात मोहाडीतील तरुणाचा मृत्यू झाला. प्रवीण पितांबर मोरे-भील (20, रा.मोहाडी, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू
प्रवीण मोरे हा मोहाडी गावामध्ये आई-वडील लहान भाऊ आणि बहिणीसह वास्तव्याला होता. प्रवीण आणि त्याचे वडील दोघे ट्रॅक्टर चालक असून गावातच मजुरी करतात. प्रवीण भील याचा मे महिन्यात साखरपुडा झाला होता, जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे अवघ्या काही दिवसांनी प्रवीण याचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मात्र मंगळवारी रात्री प्रवीण मोहाडी गावाच्या पुढे सावखेडा शिवारातील रेल्वे पुलाजवळ खांबा क्रमांक 429/12, डाऊन लाईन जवळ रेल्वे खाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिासांनी दुचाकीवरून तरुणाची ओळख पटवली.