किनगावातील दोन लाख 25 हजारांचे फसवणूक प्रकरण : अटकेतील आरोपीला कोठडीत रवानगी


2 lakh 25 thousand fraud case in Kingaon: Arrested accused sent to custody यावल : तालुक्यातील किनगाव येथील एका व्यावसायीकाची एकाने बांधकाम साहित्य खरेदीत खोटे धनादेश देत दोन लाख 25 हजारात फसवणूक केली होती. संशयिताला चोपडा येथून ताब्यात घेत यावल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्यनंतर संशयिताला शनिवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे फसवणूक प्रकरण
किनगाव, ता.यावल येथील बांधकाम साहित्य व्यावसायीक भूषण पाटील यांची संशयीत आरीफ खान ईसा खान (रा.विवरे, ता.रावेर) व फोनवर आदिवासी शाळेतील शिक्षक म्हणून बोलणार्‍या व्यक्तीने दोन लाख 25 हजार 36 रुपये किंमतीचे सिमेंट, आसारी व इतर बांधकाम साहित्य खरेदी करीत या साहित्यापोटी धनादेशही दिला होता मात्र धनादेश खोटा व बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संशयिताचा शोध सुरू असतानाच संशयीत चोपडा येथे एका ढेपच्या व्यापार्‍याची फसवणूक करीत असताना त्यास तक्रारदारानेच ताब्यात घेत यावल पोलिसांच्या ताब्यात देत त्याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. संशयीताला यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्या समोर हजर केले असता संशयीतास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !