फेसबूकवरून जुळले प्रेम, लग्नही केले मात्र अचानक चारठाण्यातील विवाहितेने घेतला गळफास


A young married woman of Charthana village committed suicide by hanging herself मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील 20 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. कविता प्रमोद भटकर (20, चारठाणा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. कविता यांनी आपल्या राहत्या घरातील लाकडी बल्लीला दोरीला गळफास घेतला. आत्महत्येचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

सासरे घरी येताच उघडकीस आली घटना
गुरुवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास विवाहितेने गळफास घेतल्याचे या मयताचे सासरे सुगदेव खंडू भटकर हे रानातून बकर्‍या चारून घरी आल्यानंतर उघडकीस आले. सुनेने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरड केली.
रहिवासी जमल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला तर पोलिसांना सूचित करण्यात आले. पती प्रमोद सुगदेव भटकर यांच्या जबाबावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक् संदीप दुनगहू करीत आहे.

दोन वर्षांपूर्वीच विवाह
मयत विवाहितेची फेसबुकवरून प्रमोदशी मैत्री झाल्यानंतर दोघे विवाहबद्ध झाले. सुमारे दोन वर्षांपूर्वीच ते विवाहबद्ध झाले होते तर प्रमोद भटकर हा खडी मशीनवर ऑपरेटर म्हणून कामाला होता. विवाहितेने गळफास घेतल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !