तळवेल येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
A minor girl from Talvel was lured and abducted भुसावळ : भुसावळ तालुक्यातील तळवेल गावातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आला.
या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञाताविरोधात पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.
